ताज्याघडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर दगडफेक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक चव्हाणांच्या नांदेड येथील घरावर ही दगडफेक झाली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दगडफेक करणारी महिला कोण होती याची माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र ही महिला मनोरुग्ण असल्याचं बोललं जात आहे. या महिलेने केलेल्या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्यावेळी या महिलेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. मात्र, एक दगड हा थेट सुरक्षा रक्षकांच्या केबिनवरील काचेवर लागला आणि काच फुटली. या महिलेने दगडफेक का केली या संदर्भात अद्याप स्पष्टता नाहीये. दरम्यान अशोक चव्हाणांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

22 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago