गुन्हे विश्व

वाळू चोरीची वाट अडवणाऱ्या शेतकऱ्यास ग्रामपंचायतीसमोर बोलवून बेदम मारहाण

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल 

नदीकाठी शेती असणारा शेतकरी म्हणजे मळई रानाचा नशीबवान मालक म्हणून ओळखला जातो.पण पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील काही गावांमध्ये वाळू चोरांनी घातलेला हैदोस नदीकाठची शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला असून अनेक गावातील मुजोर वाळूचोर वाळूची वाहने नदीपात्रातून वर काढण्यासाठी बेधडकपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढत असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे.तर काही ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्याच्या परवानगी शिवाय त्याच्याच शेतात वाळूचा साठा करून खेपा मिळल तसे वाळू उचलली जाते.काही ठिकाणी त्या शेतकऱ्यास काही पैसे देऊन गप्प केले जाते मात्र काही ठिकाणी अशा बेकायदेशीर बाबीस सहकार्य करण्यास शेतकरी तयार होत नाही तेव्हा त्याला दमदाटी प्रसंगी मारहाणीस देखील सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षात सातत्याने घडले आहेत.
असाच प्रकार ३१ ऑगस्ट रोजी घडला असून आंबे तालुका पंढरपुर येथील शेतकरी संभाजी सदाशिव शिंदे वय-49 वर्षे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शेतातुन नदीकडे जाणारा रोडवरुन गावातील तानाजी शिंदे व इतर लोक चोरुन नदीपात्रातुन वाळु वाहुन नेत असल्याचे फिर्यादीस कळताच त्यांनी शेतातील नदीकडे जाणारा कच्चा रोड दगडे टाकुन बंद केला.त्यानंतर परस्पर तानाजी शिंदे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी फिर्यादीच्या शेतातील वाटेवर टाकलेली दगडे काढुन टाकल्याचे व पुन्हा चोरुन वाळु वाहत असल्याचे समजले.बाबत फिर्यादीने दि.29/08/2021 रोजी पोलीस ठाणेशी संपर्क साधुन चोरुन वाळु वाहतुकीबाबत माहिती दिली.त्यामुळे चोरुन वाळु वाहतुक बंद पडली होती.त्यामुळे ते लोक फिर्यादीवर चिडुन होते. दि.
31/08/2021 रोजी मला सकाळी 10/00 वाजता फिर्यादीस ग्रामपंचायती जवळ बोलविण्यात आले.त्यावेळी वाट अडवणारा शेतकरी संभाजी शिंदे हे तेथे गेले व वाळुसाठी वाट चालु ठेवणार नाही असे सांगताच पाठीमागुन तानाजी शिवाजी शिंदे यांने संभाजी शिंदे यांच्या कानाच्या पाठीमागे हाताने जोरात ठोसा मारला त्यानंतर लागलीच त्याचे चोरुन वाळु वाहतुक करणारे गावातील साथीदार बापु शिवाजी शिंदे,हरि शिवाजी शिंदे,निशाल बापु शिंदे,विकास बापु शिंदे,धनाजी उध्दव शिंदे,शंकर राजाराम शिंदे,सिध्दु सुरेश नागणे,आनंदा जनार्ध सगर,बाबुराव मनोहर जाधव यांनी फिर्यादीस खाली पाडुन हाताने,लाथ्थाबुक्याने मारण्यास सुरुवात केली.
जमलेल्या लोकांनी सोडवा-सोडवी केल्यानंतर फिर्यादी मुलगा दिपक असे मोटार सायकलवरुन घडल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेकडे येत असताना पाठीमागे तानाजी शिवाजी शिंदे हा त्याची फरच्युनर चार चाकी गाडी नं.एम.एच.14 इ.डब्ल्यु1111 यामधुन त्यांचा पाठलाग करीत होता.गाडीतील तानाजी शिवाजी शिंदे हा त्याचा चालक सिध्दु नागणे यास घाल याच्या अंगावर गाडी ,सोडु नको,खल्लास कर असे मोठ्याने ओरडुन म्हणत असल्याचे फिर्यादीने ऐकले त्यामुळे घाबरुन वेगाने मोटारसायकलवर चळे पाटीजवळ आले असता त्यावेळी पाठीमागे असलेली फॉर्च्युनर गाडी फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला चारीत गेली.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago