ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या  सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या  सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून निदर्शने करण्यात येऊन काम बंद आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेच्यावतीने ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सह कार्यअध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना सुनील वाळूजकर यांनी सांगितले की, दिनांक 30/08/2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू यादव नावाच्या फेरीवाले कडुन धारदार शास्त्रने त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे.* आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य  खच्चीकरणं होणार आहे होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणेसाठी व  हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणेसाठी या घटनेचा निषेध म्हणून  पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नगरपरिषदे समोर निदर्शने करण्यात येत असून  आज  संपूर्ण कामकाज  बंद करण्यात आले असल्याचे सांगितले यावेळी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष किशोर खिलारे, जयंत पवार, अनिल गोयल, नागनाथ तोडकर, गुरू दोडिया,महावीर कांबळे, दशरथ यादव, विठ्ठल वाघमारे, दत्तात्रेय चंदनशिवे, संजय माने, संभाजी देवकर, चिदानंद सर्वगोड,नेताजी पवार, सुवर्णा डमरे, प्रज्ञा देशमुख, अस्मिता निकम, राणी गायकवाड व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago