ताज्याघडामोडी

लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने चिल्ड्रन हेल्थ पार्क चे उद्धाटन संपन्न :- लायन्स क्लब चे काम कौतुकास्पद :- आमदार प्रशांतराव परिचारक

लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने चिल्ड्रन हेल्थ पार्क चे उद्धाटन संपन्न :-

लायन्स क्लब चे काम कौतुकास्पद :- आमदार प्रशांतराव परिचारक

लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क या प्रकल्पाचे उद्धाटन आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, लायन्स संस्थेचे प्रथम उपप्रांतपाल ला.राजशेखर कापसे, रघुकुल सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
ईंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, लायन्स क्लब पंढरपूर व मनप्पूरम फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने सदर उपक्रम राबवण्यात आला.
सदर लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क रघुकुल हौसिंग सोसायटीतील ओपन स्पेसमधे 3000 स्क्वेअर फुट जागेत तयार करण्यात आले असुन या पार्कमधे विविध प्रकारच्या १४ खेळण्यांचा समावेश करण्यात आला असुन. लायन्स संस्थे मार्फत मजबूत व चांगल्या प्रतीची खेळणी बसवण्यात आली. सदर उपक्रमास पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी वापरण्यात आला.
लायन्स सदस्य आर्किटेक्ट ला.सतीश शेटे यांनी सदर प्रोजेक्ट मध्ये विशेष सहकार्य केल्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधुन पंढरपूरातील प्रसिद्ध फोटोग्राफर बशीर शेख यांचाही सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात आमदार प्रशांतराव परिचारक यांनी लायन्स संस्थेचे केलेल्या विशेष उपक्रमाचे कौतुक केले व लहान मुलांचा सर्वांगीण विकास या पार्क च्या माध्यमातून होईल व मुलांना मैदानी खेळाची आवड लागेल. नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सांगितले की लायन्स संस्था गरजुसाठी विविध उपक्रम राबवत असुन, आजचा हा लहान मुलांसाठी कायमस्वरूपी व उपयुक्त उपक्रम लायन्स संस्थेने राबवला असल्याचे सांगितले व लायन्स संस्थेचे अभिनंदन केले. लायन्स अध्यक्ष, माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की कोरोनाने आपणास दाखवून दिले कि शरीर संपत्ती हि सर्वोत्कृष्ट संपत्ती असते, सदर पार्क मुळे लहान मुलांना मैदानात विविध खेळ खेळण्याची आवड लागेल व संधर्ष करण्याची सवय लहान वयातच होईल व मोबाईल पासुन त्यांची सुटका होईल व लगेचच पुढील वर्षी दुसऱ्या ठिकाणी आणखी एक Chilrden Park बनवण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले. डॉ.सुजाता गुंडेवार यांनी सांगितले की सर्व लायन्स सदस्यांच्या मदतीने आमचे चिल्ड्रन पार्क चे स्वप्न आज पुर्ण होत असल्याने खुप आनंद वाटत असल्याचे सांगितले व मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे किती महत्त्वाचे असते याची माहिती त्यांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्रेयी केसकर यांनी केले तर रा.पा.कटेकर यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, गटनेते गुरुदास अभ्यंकर, नवनाथ रानगट, आदित्य फत्तेपुरकर, नारायन सिंघन,ललिता कोळवले,डॉ. मृणाल गांधी, माजी अध्यक्ष डॉ.पल्लवी माने, डॉ.ऋजुता उत्पात,आरती बसवंती, सुरेखा कुलकर्णी, लता गुंडेवार, उर्मिला गुंडेवार, सरिता गुप्ता, शोभा गुप्ता, सीमा गुप्ता, प्रतिक्षा येलपले, माधुरी गायकवाड, माधुरी जाधव,ज्योती कटेकर,सरोज लाड, डॉ.अजित गुंडेवार, राजेंद्र शिंदे,अतुल कौलवार, मंदार केसकर, कैलास करंडे, ओंकार बसवंती, गिरीश पाटील, लायन सदस्य व रघुकुल सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago