ताज्याघडामोडी

राणेंना आता नाशिक पोलिसांची नोटीस; 2 सप्टेंबर रोजी द्यावी लागणार हजेरी

महाडच्या कोर्टाने काल जामीन मंजुर केल्यानंतरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांना आता नाशिक पोलिसांनी नोटीस जारी केली असून त्यांना 2 सप्टेंबर रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात नाशिक मध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने त्यांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम 500, 505(2), 153 (बी) (1) (सी) या कलमान्वये त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या विरोधात जो गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्या अनुषंगाने आपली चौकशी करणे आवश्‍यक ठरल्याने आपण तपास अधिकाऱ्यांच्या पुढे हजर राहावे असे त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीशी मध्ये म्हटले आहे.

सीआरपीसीच्या कलम 41 अंतर्गत ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात जेव्हा गरज असेल त्यानुसार चौकशीला हजर राहण्यासही राणे यांना सांगण्यात आले आहे. राणे हे पोलिसांना सहकार्य करीत आहेत, त्यांनी यापुढे असला प्रकार करणार नाही असे त्यांनी पोलिसांना लिहून दिले आहे, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

त्यांना फक्त चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस जारी केली गेली आहे असे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. पांडे यांनी काल राणेंना अटक करण्याचा आदेश काढला होता व त्यासाठी पथकेही कोकणात पाठवली होती. आपल्या या कृतीचेही पांडे यांनी आज समर्थन केले. माझ्या मते मी काढलेली ऑर्डर योग्य आहे आणि त्या बाबत मी ठाम आहे असे पोलिस आयुक्तांनी आज पत्रकारांना सांगितले. राणे यांच्या विरोधात एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago