ताज्याघडामोडी

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये  बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये  बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*स,
सांगोला :फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड  ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. एच.एस.सी बोर्ड परीक्षा २०२१  मध्ये कॉलेजचा निकाल १०० %  लागला आहे. यावेळी  सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर  मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने  व सरस्वती पूजनाने करण्यात आली. बारावीतील प्रथम क्रमांक कुमारी नांगरे अमृता सुरेश, द्वितीय क्रमांक घाडगे ऋतुजा सदाशिव व तृतीय क्रमांक जास्मिन बशीर पटेल या सर्व विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व गुणपत्रिका देऊन संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते  गौरविण्यात आले. यावेळी फॅबटेक पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी व इंजीनियरिंग क्षेत्रातील माहिती सांगितली.  फॅबटेक  कॉलेज  ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी फार्मसी विभागाची माहिती सांगून कोरोणाच्या काळातील औषध निर्मिती शास्त्राचे महत्त्व सांगितले.

 त्याचप्रमाणे फॅबटेक कॉलेजचे अकॅडमिक डीन प्रा.टी एन जगताप  यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. डॉक्टर कणसे सर यांनी विद्यार्थ्यांना  विविध क्षेत्रातील करिअरचे मार्ग सांगितले.  प्रा. पराग  दौंडे व प्रा. संजय पवार  यांनी फॅबटेक कॉलेजमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स याची माहिती व वाढते तंत्रज्ञान याविषयीची माहिती दिली. संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री भाऊसाहेब रुपनर  यांनी कॉलेजमधील विविध शाखा व तंत्रज्ञानाकडे होणारी वाटचाल या विषयाची  माहिती देऊन यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील  यांनी  शिक्षणाचे महत्त्व व  यशस्वी जीवनासाठीचा  मार्ग  याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वनिता बाबर  यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. सुदर्शन भंडारे  यांनी केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमासाठी  प्राचार्य  सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले  तसेच  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेहि  सहकार्य लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago