ताज्याघडामोडी

पारनेरच्या महिला तहसीलदाराचे आमदार निलेश लंकेंवर गंभीर आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केले आहेत.यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. देवरे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचाही उल्लेख केलेला आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी माहिती काढलेली असून मी स्वतः त्यांच्या संपर्कात आहे. ज्यावेळी कोणत्याही महिलेचा विषय येतो तेव्हा आपण सर्वांनी संवेदनशीलपणे विचार केला गेला पाहिजे. एखादी क्लिप आली म्हणजे समज गैरसमज होतात. त्यामुळे त्या महिलेची प्रायव्हसी देखील जपली पाहिजे. आम्ही त्यात स्वतः जातीने लक्ष घालत आहोत, त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वासू ठेवू नये, एवढच मी सांगू शकते.”

या प्रकरणामुळे भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर हल्ला चढवला होता.आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमधून संताप व्यक्त करत चित्रा वाघ म्हणाल्या, “सत्तेतले हे बेलगाम घोडे.देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होत आहे का तेच आता पाहायचंय.”

“तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की, मीही तुझ्याकडे लवकरच येत आहे. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलं आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हीच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या क्लिपमध्ये म्हटलं आहे. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे”, असं वाघ यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago