ताज्याघडामोडी

पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू, पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सुरेश पिंगळे यांनी टोकाचं पाऊल का उचललं?

केवळ पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही या कारणाने सुरेश पिंगळे यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटसमोर स्वत: ला पेटवून घेतलं होतं. दोन अडीच महिने ते खडगी पोलीस ठाणे, तसेच पोलीस आयुक्तालयात हेलफाटे मारत होते. मात्र कुठलंतरी कारण सांगून त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जात नव्हतं. त्यामुळे ते वैतागले होते. अखेर त्यांनी संतापात स्वत:ला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पिंगळे पाषाण येथील एआरडीई येथे कंत्राटी पद्धतीने ऑफिस बॉयचं काम करायचे. त्यांचा दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट बदलायचा. तिथे दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेशन लागायचं. आतापर्यंत दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेश लागत होतं. दरवर्षी ते मिळत होतं. पण यावेळी त्यांना अडचण आली.

“मला न्याय हवाय. माझ्या मुलांचं मी काय करु. मला नोकरी नाही. एकतर मला नोकरीला लावावं. मला नोकरी लागली तर मुलांचं पोट भरेल. कारण नोकरीसाठीच त्यांनी आत्मदहन केलं आहे. पोलीस अधिकारी याबाबत लेखी स्वरुपात सांगत असतील आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ”, असं पिंगळे यांच्या पत्नीने सांगितलं.

मृतदेह ताब्यात घेणार नाही, पिंगळे यांच्या कुटुंबियांची भूमिका

या घटनेनंतर पिंगळे यांचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून जोपर्यंत आपल्या जबाबादारीची हमी देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पिंगळे यांच्या पत्नीने घेतली आहे. या घटनेनंतर पिंगळे यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

बुधवारी पोलीस आयुक्तालयात थरार

सुरेश पिंगळे बुधवारी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आले होते. त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हवं होतं. पण कदाचित त्यांना वेळेवर ते प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी संतापात टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं. इतकंच नाही तर त्या पेटत्या अंगाने त्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली. हा सर्व थरार उपस्थित लोक पाहात होते. त्याचवेळी काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पेटत्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचं धाडस काहींना करता आलं नाही. पण काहींनी ते धाडस करुन, आग विझवली. त्यानंतर सुरेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दोन दिवसांच्या उपचारानंतरही सुरेश यांची प्राणज्योत मालवली. या सर्व थरारानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago