गुन्हे विश्व

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

धाकट्या मुलाच्या मदतीने सख्ख्या आईनेच आपल्या मोठ्या मुलाची हत्या  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचा मृतदेह आरोपी मायलेकांनी घरातच पुरला होता. मात्र घरातील एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून आत्या आणि तिच्या नवऱ्याला संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. हरियाणातील रोहतकमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला.

22 वर्षीय कर्मपाल उर्फ राहुल अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याची आई आणि भावानेच हत्या करुन मृतदेह घरात पुरला आहे, अशी तक्रार राहुलच्या आत्या आणि तिच्या नवऱ्याने पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. त्यांच्या घरातून राहुलचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

राहुल दर आठ-पंधरा दिवसांनी आपल्या आत्याच्या घरी भेटायला यायचा. मात्र दोन महिने उलटून गेले, तरी तो न आल्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आत्या आणि तिचे यजमान रोहतकजवळील सैमाण गावात त्याला भेटायला आले. तिथे एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून त्यांच्या संशयाचं खात्रीत रुपांतर झालं. त्यांनी तडक पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी फरिदाबादमधून आई, तर रोहतकमधून मुलाला अटक केली. सैमाण गावातील घराची जमीन उकरुन त्यातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.

चंद्रपुरात मोठ्या भावाने धाकट्याला पुरलं

दुसरीकडे, टीव्हीवरील गुन्हे विषयक मालिका आणि फिल्मी पद्धतीने गुन्हे करण्याच्या योजना पाहून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गेल्या वर्षी घडली होती. खून केल्यानंतर या निर्दयी मोठ्या भावाने लहान भावाचा मृतदेह फिल्मी स्टाईलने पुरला. चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात हा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago