ताज्याघडामोडी

फॅबटेक समूहाचे औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य

सांगोला: फॅबटेक हे सांगोला तालुक्यात व परिसरात औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर नाव ओळखले जाते. याबरोबरच फॅबटेक टेक्निकल कॅम्पसची निर्मिती करून यामध्ये विविध विद्या शाखा सुरु करण्यात आल्या असून त्या अग्रक्रमाने प्रगती करीत आहेत. फॅबटेक समूहामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज, फार्मसी कॉलेज,पब्लिक स्कूल,स्पारकॉन गारमेंट व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक आदी विविध माध्यमातून या सर्व क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण केजी टू पीजी कॅम्पस, अतिशय देखणे इन्फ्रास्ट्रक्चर, नैसर्गिक वेली वृक्षांनी नटलेला भव्य परिसर अशा या संस्थेची ज्यांनी उभारणी केली ते रुपनर बंधू विशेषतः भाऊसाहेब रुपनर यांनी अनेक जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. रुपनर बंधूनी जिद्द,चिकाटी व कष्टाच्या जोरावर फॅबटेक समूहाची निर्मिती केली आहे.

सध्या फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये १२४० विद्यार्थी, पॉलीटेक्नीकल डिप्लोमा मध्ये ५४० डी व बी फार्मसी मध्ये ५२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज (सीबीएसई बोर्ड स्कूल) ५७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

आर्टीफिसिअल इंटेलिजिअन्स अँड डेटा सायन्स या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाकरीता ६० जागा आहेत. या शैक्षणिक संकुलात जवळजवळ २५० जण नोकरी करीत आहेत. आर्थिक दृष्ट्या गोरगरीब विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत दिली जाते. परगावच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये मुलांच्या वसतिगृहामध्ये ५२५ विद्यार्थी व मुलींच्या वसतिगृहामध्ये २२० विद्यार्थिनीसाठी राहण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

सामाजिक कार्य

कोल्हापूर सांगली जिल्ह्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पूरग्रस्तांना आर्थिक मदत देणे. स्वखर्चातून ग्रामपंचायत विकासासाठी मोलाचे सहकार्य केले. कोविड काळात अनेक गोरगरीब जनतेला मदतीचा हात म्हणून जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. सांगोल्यातील रुग्णांना कोविड सेंटर म्हणून मुलांचे वसतिगृह सर्व सोयींनी उपब्ध करून देण्यात आले आहे. गेली दीड वर्षांपासून हे कोविड सेंटर रुग्णानाच्या सोयीसाठी उपलब्ध आहे. त्यांनी स्वतःही कोविड रुग्णांसाठी औषधांचा पुरवठा केला आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर व बेड उपलब्ध करून देण्यात आले होते.

एकतपूर सारख्या माळरानावर महिलांसाठी ‘स्पॉरकॉन गारमेंट’ उभारून त्यामध्ये ५५० महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या आर्थिक जडण घडणीत कुटुंबाना उभारी देण्याचे मोलाचे कार्य या माध्यमातून होत आहे. याठिकाणी कट टू पॅक जेन्टस आणि लेडीज शर्ट तयार करण्यात येतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे कार्य समाजातील विविध व्यक्ती आजही करीत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अशा व्यक्तींच्या व संस्थांच्या यशस्वी वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago