आ.आवताडे आणि आ.परिचारक यांनी घेतली अजितदादांची भेट

लस उपलब्धता वाढवावी यासाठी ना.राजेश टोपेंना भेटणार -आ. समाधान आवताडे 

सोलापूरचे जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर यांनी ९ ऑगस्ट रोजी आदेश काढत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या कारणावरून पंढरपूर शहर व तालुक्यातही १३ ऑगस्ट पासून संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या विरोधात पंढरपूर शहरातील छोटे मोठे दुकानदार,पथ विक्रेते,हॉटेल चालक यासह विविध आस्थापना चालकांनी संघटीपणे यास विरोध करण्यास सुरुवात केली असून सोमवारी शहरातील या व्यवसायीकानी आ.प्रशांत परिचारक व आ.समाधान आवताडे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या व हि संचार बंदी मागे घेण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न केले जावेत अशी मागणी केली.तर मंगळवारी घंटानाद आंदोलन तर आज अर्धनग्न आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा निषेध केला.सामान्य जनतेत संचार बंदी विरोधात निर्माण झालेल्या संतापाची दखल घेत आज आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संचारबंदीचा आदेश शिथिल करावा अशी मागणी केली असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली.उद्या दुपारी ३ वाजता या बाबत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून त्या नंतर संचार बंदी ऐवजी ज्या गावात अथवा भागात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे थेट कंटेनमेंट झोन करून कडक अंमलबजावणी केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते.
           संचार बंदीच्या आदेशाबाबत आज पंढरपुरात अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय अधिकारी,आरोग्य अधिकारी याची बैठक झाली.त्यावेळीही शहरातील अनेक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी संचारबंदीस विरोध दर्शविला मात्र प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराच श्री.जाधव यांनी दिल्याने संचार बंदीबाबत प्रशासन ठाम असल्याचेच दिसून आले.
    आ.समाधान आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या या बाबत निर्णय होईल अशी अपेक्षा असून त्याच बरोबर पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या व पंढरपुरात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची वर्दळ पाहता विशेष बाब म्हणून शहर तालुक्यासाठी लसीची उपलब्धता वाढवावी अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटून करणार असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी सांगितले.   
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत दिलेल्या निवेदना बाबत पंढरपूर शहरवासियांना उत्सुकता
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने शासनाकडून दरवर्षी ५ कोटी रुपये यात्रा अनुदान नगर पालिकेस देण्यात येते.गतवर्षी मिळालेल्या ५ कोटी व यावर्षी मिळणाऱ्या ५ कोटी यात्रा अनुदानाचा विनियोग गेल्या वर्षी चारही प्रमुख यात्रा भरल्या नसल्यामूळे व या वर्षी माघी,चैत्री आणि आषाढी न भरल्यामुळे नगर पालिकेने पंढरपूर शहरातील निवासी मालमत्ता धारकांना करमाफी देण्यासाठी करावा अशी मागणी होत आहे. गत वर्षी प्राप्त झालेल्या ५ कोटी यात्रा अनुदानातून नगर पालिकेने प्रदक्षिणा रस्त्याचा काही भाग कॉक्रीटीकरण करण्यासाठी व शहरातील नवीन कराड नाका परिसरात पथदिवे लावण्यासाठी करण्याचा निर्णय घेत त्याची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.तर या वर्षीच्या ५ कोटी यात्रा अनुदानाचा विनियोग कसा केला जाणार हे अजून स्पष्ट नाही.नागिरकांना करमाफी देणयासाठी यात्रा अनुदानाचा विनियोग करण्यात शासनाने यात्रा अनुदान देताना त्याच्या विनियोगाबाबत घातलेल्या अटींचे कारण पुढे केले जाते.या अटी शिथिल करून जसे विशेष बाब म्हणून अनुदान दिले जाते तसेच विशेष बाब म्हणून करमाफीत सवलत देण्यासाठी नगर विकास विभागाने परवानगी द्यावी अशी अपेक्षा पंढरपुरातील यात्रेवर अवलंबून असलेल्या नागिरकांची आहे.त्यामुळे आज नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आ.समाधान आवताडे व आ.परिचारक यांनी त्यांना निवेदन देत चर्चा केली असून यात करमाफी देण्याबाबत काही चर्चा झाली का ? हे जाणून घेण्याची उत्सुकता पंढरपूरकरांना लागली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

22 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago