पंढरपूरकरांचे टेन्शन वाढले

मार्च महिन्याच्या सुरुवातीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस राज्यात सुरुवात झाली अशातच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली.शहरातील सर्वच कोविड हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाले आणि कोरोना बाधितांना उपचारासाठी अक्षरश सांगली कोल्हापूर कडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे भाग पडले.मे महिन्याच्या सुरुवातीस तर दरदिवशी ५०० शेच्या  आसपास कोरोना बाधित आढळून येऊ लागले.होते दर दिवशी मृतांचा आकडाही धडकी भरविणारा होता.मात्र जून महिना अखेरीस हि संख्या मोठ्या प्रमाणात घटत गेली आणि पंढरपुर शहर तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबरच निर्माण झालेली भीतीची लाट हि ओसरत गेली.लॉकडाऊन शिथिल केला गेला आणि नागिरक पुन्हा बिनधास्त वावरू लागले.याच काळात तज्ञ् कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देत होते पण तो फारसा गंभीरतेने अजूनही घेतला जात नसल्यानेच आता पंढरपुर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा मोठ्या वेगानेव वाढू लागली असून उपचाराआधीन कोरोना बाधितांची संख्या १ हजाराच्या पुढे गेल्याचे आजच्या अहवाला वरून स्पष्ट होत आहे. 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात नव्याने ११ तर तालुक्यात ११५ कोरोना बाधितांची भर पडली आहे.तर ग्रामीण भागातील २ व्यक्ती कोरोनामुळे मयत झाले आहेत.तर तर आजच्या अहवालानूसार शहर आणि तालुक्यातील १०११ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत.जर पंढरपूर शहर तालुक्यातील हि रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर शहरातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर पुन्हा भरू लागतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.सध्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पंढरपुर,माळशिरस हे दोन तालुके पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत.त्यामुळे जिल्हा प्रशासनही या तालुक्यात पुन्हा निर्बंध लादण्याची तयारी करत असतानाच जिल्हयाचे पालकमंत्री ना.भरणे यांनी लोकप्रतिनिधीशी चर्चा या बाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.मात्र नागिरकांनीही दक्षता नाही घेतली तर शहर व तालुक्यात वाढत चाललेली कोरोना सक्रिय बाधितांची संख्या निश्चितपणे प्रशासनास कठोर निर्णय घेण्यास भाग पाडेल असेच वाटते. 

           

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago