ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्धविहार उभारणीस अंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करून देणार: राजरत्न आंबेडकर

पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्धविहार उभारणीस अंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करून देणार: राजरत्न आंबेडकर

जगातील आदर्श अश्या भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या नीतीनियमांचा प्रचार आणि प्रसार लोकशिक्षणातून करण्यासाठी पर्यायाने प्रबुद्ध समाज निर्मितीसाठी बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरी नगरीच्या सांस्कृतिक वैभवात तथा पर्यावरणीय सौंदर्यात अधिक भर घालणारे अत्याधुनिक बुद्धविहार पंढरपूरातील  यमाई तलाव परिसरातील शासन मालकीच्या जमिनीपैकी दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील दहा एकर जमिनीवर उभारण्याबाबत प्रस्ताव पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतारसंघाचे आमदार   दिवंगत भारत (नाना) भालके यांच्या शिफारसीनुसार आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणचे तत्कालीन सदस्य विद्यमान आमदार प्रशांत परिचारक (विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या पाठिंब्याने पंढरपूर नगरपरिषदेने आपल्या सर्वसाधारण सभा अजेंडा विषय क्र. ५ ठराव क्र. ३७ दिनांक ३०/०४/२०१२ आणि अजेंडा विषय क्र. २३ प्रो. क. ११९ दिनांक १४/०९/२०१२  नुसार झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने वेळोवेळी शासनस्तरावर पत्रव्यवहार करून दिनांक १३/०७/२०१८ रोजी जा. क्र./पं न पं /न अ /२९१९/२०१८ नुसार सविस्तर प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी मा. ना. डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मा. ना. संजय बनसोडे, राज्यमंत्री,पर्यावरण,महाराष्ट्र राज्य, माजी विधान परिषद सदस्य  मा. प्रा. जोगेंद्र कवाडे सर, विद्यमान आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार मा. समाधान(दादा) आवताडे,  आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. श्रीकांत शिंदे, आणि पंढरीतील सर्व सामाजिक, राजकीय पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

pजागतिक किर्तीचे बौद्ध धम्म प्रचारक तथा प्रसारक दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजरत्न आंबेडकर यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित बुद्धभुमिला भेट दिली. यावेळी त्यांनी पंढरपुरात साकार होणाऱ्या भव्य, अत्याधुनिक तसेच पर्यावरणीय सौदर्य वृद्धिंगत करणाऱ्या बुद्धविहाराचे मानसचित्र जनतेसमोर मांडून समाधान व्यक्त केले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील जागतिक कीर्तीचे भव्य दिव्य बुद्धविहार साकारणाऱ्या पंढरपूर नगरपरिषदेचे आभार व्यक्त करीत त्यांना आपल्या स्तरावरून शासनाकडे  पाठपुरावा करू. आणि मी जागतिक बौद्ध परिषदेचा संयुक्त सचिव या नात्याने अंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेकडून लागणारा सर्व निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन पंढरपूर येथील पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेस संबोधित करताना दिले. यावेळी निवृत्त पोलिस आयुक्त भारत शेळके, सम्यक क्रांती मंच चे संस्थापक सिद्धार्थ जाधव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, सहसचिव स्वप्नील गायकवाड, खजिनदार रविंद्र शेवडे, रवी सर्वगोड, केदार चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago