ताज्याघडामोडी

वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत

वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी

पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत

पंढरपूर: धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन व पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा १ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिजीत पाटील यांची सामाजिक कार्याची आवड व सामाजिक भान संपूर्ण तालुक्याला परिचित आहे. प्रत्येक संकटाच्या काळात भक्कमपणे पाऊल टाकले आहे. देशासह महाराष्ट्रात कोवीडच्या काळात  ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने आपल्या कारखान्यात ऑक्सिजन प्रकल्प उभा करून सबंध महाराष्ट्रात ऑक्सिजन मॅन म्हणून ओळख झाली अशा सामाजिक बांधिलकीतून आपल्या वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी MPSC च्या नेमणुका न मिळाल्याच्या तणावाने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला. लोणकर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.याची जाणीव ठेवून अभिजीत पाटील यांनी एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश स्वप्निल लोणकर यांच्या वडिलांच्या हातात सुपूर्द केला.

लोणकर घरात एकूलता एक तरूण मुलगा गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मदत केली.असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

24 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago