ताज्याघडामोडी

दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न

दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी)
येथील वै. विद्यावाचस्पती डॉ. दादा महाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच झाला. येथील भगवानराव मनमाडकर यांच्यावतीने एकदिवसीय नामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वारकरी संप्रदायातील अभ्यासू संत म्हणून विद्यावाचस्पती डॉ. कै.दादा महाराज मनमाडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच सोमवारी संपन्न झाला. यानिमित्ताने  परंपरेप्रमाणे ह.भ.प. महादेव महाराज आडसुळ आणि ह.भ.प.  निरंजन महाराज मनमाडकर यांच्या प्रवचनानंतर महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यापूर्वी सुदर्शन कुंभार , शिवांजली आदलिंगे आणि शुभांगीताई मनमाडकर यांची भजन सेवा झाली. वै. दादामहाराज मनमाडकर यांचे असंख्य भक्तगण  यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करून आशीर्वाद घेतले.
   यानिमित्ताने आमदार प्रशांत परिचारक , प्रणव परिचारक ,  रोहन परिचारक ,  प्रणितीताई भालके , मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदीसह वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींसह मान्यवरांनी येऊन दादा महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यानिमित्ताने महाराजांचे पंढरपूरसह आसपासच्या पंचक्रोशीतील तसेच परगावचेही भक्तगण उपस्थित होते.  मनमाडकर कुटुंबीयांच्या वतीने दादा महाराज यांचे बंधू भगवानराव मनमाडकर आणि पुतणे धनंजय मनमाडकर यांच्या वतीने सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.
 दादा महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी कोरोनामुळे हरिनाम सप्ताह न करता.  साधेपणाने कोरोना विषयक शासनाचे सर्व नियम पाळून हरिनामाच्या जयघोषात व दादा महाराजांचे स्मरण करून पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न झाला.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago