ताज्याघडामोडी

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड, नॉन कोविड सेवा अविरतपणे सुरु

राज्यात तसेच सोलापूर  जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोविड -19 आजाराची साथ सुरु आहे. या कोरोना साथीच्या कालावधीत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड-19 तसेच नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ही रुग्ण सेवा अवितरपणे सुरु असून कोरोना बाधित रुग्ण तसेच इतर आजाराचे रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार सुरु असल्याची  माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविद गिराम यांनी दिली.

            उपजिल्हा रुग्णालयात माहे एप्रिल ते जुलै 2021 या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील तसेच विविध विभागातून आलेल्या रुग्णांना सेवा देण्यात आली. यामध्ये नवजात अतिदक्षता विभागात 62 नवजात बालकांवर उपचार करण्यात आले. पुनर्वसन केंद्रातुन आठ बालकांना पोषण सेवा देण्यात आल्या. डायलेसीस विभागात 572 रुग्ण , प्रसुतीविभागात  310 प्रसुती करण्यात आल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत 265 रुग्णांवर  उपचार करण्यात आले. तसेच 586 एचआयव्ही संसर्गीत रुग्णांचे लसीकरण करण्यात आले तसेच 41 रुग्णांवर टीबीचे उपचार सुरु करण्यात आल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.

            तसेच माहे एप्रिल ते जुलै 2021  या  कालावधीत  4 हजार 390 जणांची कोविड आरटीपीसीआर  तपासणी व 8 हजार 583 हुन अधिक संशखीत रुग्णांची रॅपीड ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या कालावधीत  2 हजार 500 हुन अधिक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉ.सचिन वाळुजकर, डॉ.शिवकमल तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत.  उपजिल्हा रुग्णालयास उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले तसेच तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तसेच आवश्यक ते सहकार्य मिळत असल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago