ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष ओबीसी नेते संजय धाकु कोकरे यांच्या आदेशाने व ओबीसी युवा आघाडीचे मार्गदर्शक ऍड.उमेश टुमणे व ओबीसी महीला प्रदेशाध्यक्ष डाॅ.माधुरीताई पारपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी युवा आघाडी सोलापूर जिल्हा व ओबीसी युवा आघाडी पंढरपूर तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष सलमान आतार यांनी जाहीर केल्या आहेत.
ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करीत आलेले ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे संस्थपाक संजय कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राज्यात ओबीसी आघाडी कार्यरत आहे.ओबीसी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलमान आतार यांनी पुढील वाटचाल आणखी गतिमान करण्यासाठी जिल्हा व तालुका ओबीसी युवा आघाडीच्या नूतन पदाधिकऱ्यांची नियुक्ती केली आहे.यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी रंगनाथ नाळे,जिल्हा संघटकपदी नागजी लोखंडे,जिल्हा सरचिटणीस पदी शमशाद तांबोळी,जिल्हा सचिवपदी अक्षय जाधव,पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सोमेश्वर हराळे,तालुका उपाध्यक्षपदी सारिका पवार,तालुका सरचिटणीसपदी अमीर शेख यांची निवड करण्यात आली आहे.
विविध ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी संघर्ष करण्यासाठी ओबीसी युवा आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत अशी अपेक्षा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलमान आतार यांनी नियुक्तीचे पत्रे प्रदान करताना व्यक्त केली आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…