पंढरपुरात भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास

पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीचे प्रकार उघडकीस येत असून दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात तर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.दुचाकी चोरट्याबरोबरच आता पंढरपुरात चेन स्न्याचर देखील वावरू लागले असावेत अशी शंका  काल शनिवारी घडलेल्या घटनेवरून व्यक्त होत असून शुक्रवार दिनांक ३० जुलै रोजी भर दुपारी शहरातील भर ठिकाण असलेल्या घोंगडे गल्ली परिसरात महिलेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून वेगात आलेल्या चोरटयांनी हिसका मारून लंपास करत सुसाट वेगाने निघून गेले आहेत.

या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात राजश्री संतोष भाळवणकर वय-45वर्षे, धंदा-घरकाम, रा.घोंगडे गल्ली, पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी या एका धार्मिक कार्यक्रमासाठी जाऊन घरी परतत असताना दुपारी 4/45वाजण्याचे सुमारास एका काळ्या रंगाच्या उंच शिट असलेल्या मोटारसायकलवर अंगावर काळे जर्कींग व काळे हेल्मेट घातलेले दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील मिनी गंठण हिसडा मारून नाथ चौकाकडे भरधाव वेगात जावू लागताच फिर्यादीने मोठ्याने ओरडताच तेथील शामसुंदर भालचंद्र कोरडे व सागर नारायण खंडागळे यांनी चोरट्याना पडकण्यासाठी धाव घेतली परंतू ते दोन अनोळखी इसम आपले मोटारसायकल वरुन जोरात निघून गेले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दिवस वाईट आलेत,चोरट्यांची भीती वाढली आहे त्यामुळे महिला वर्गाने बाहेर जाताना दागिने घालूच नयेत अशी चर्चा होताना दिसून येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

10 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago