ताज्याघडामोडी

भीमा नदी काठांवरील गावांनी सतर्क रहावे

भीमा-निरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.  तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने  भीमा व नीरा नदी काठच्या गावांनी  सतर्क राहावे,असे आवाहन  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने  तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेत पिकांची व सार्वजनीक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य आपत्तीवर वेळेत व प्रभावीपणे कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवावा.  वेळोवळी पाणी पातळीत होत असलेल्या बदलांबाबत नदीकाठच्या गावांना अवगत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. नदीकाठच्या नागरिकांनी  सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सुरक्षित असलेल्या शासकीय इमारती, शाळा, मंदीर या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा, विद्युत पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहील याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केल्या.

आपत्कालीन परस्थितीत ग्रामस्तरीय समितीने सतर्क रहावे, शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणीच थांबावे . तसेच महसूल, पोलीस, लघुपाटबंधारे, जलसंधारण, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनीक बांधकाम, कृषी व ग्रामपंचायत विभागांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे अशा सूचनाही श्री. ढोले यांनी यावेळी दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago