गुन्हे विश्व

गुंड संदीप मोहोळ खूनप्रकरणात तिघांना ‘जन्मठेप’; गणेश मारणेसह 12 जणांची निर्दोष मुक्तता

गुंड संदीप मोहोळ याच्या खूनप्रकरणात तिघांना जन्मठेप आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, 12 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सचिन पोटे, जमीर शेख, संतोष लांडे यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर, तिघा आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा निकाल दिला.

टोळीच्या वर्चस्व वादातून गुंड संदीप मोहोळ याचा 4 ऑक्‍टोबर 2006 रोजी पौड फाटा येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. यानंतर गुन्हे शाखेने गणेश मारणे, सचिन पोटे आणि इतर अशा 18 जणांना अटक केली होती. याप्रकरणी मोक्का, आर्म ऍक्‍ट, खून यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल होता.यात पांडुरंग मोहोळ, दिनेश आवजी आणि इंद्रनील मिश्री यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला आहे.

सरकारी वकील म्हणून तत्कालिन जिल्हा सरकारी वकील ऍड. उज्ज्वला पवार, ऍड. विलास पठारे यांनी काम पाहिले. तर आरोपींकडून ऍड. सुरेशचंद्र भोसले, ऍड. डॉ. चिन्मय भोसले, ऍड. सुधीर शहा, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. एन. डी. पवार ऍड. ऍड. संदीप पासबोला, ऍड. राहुल वंजारी, ऍड. अतुल पाटील, ऍड. धैर्यशील पाटील, ऍड. जितेंद्र सावंत, ऍड. राहुल भरेकर, ऍड. विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago