ताज्याघडामोडी

माढ्याच्या सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील ४ आरोपी पसार

विविध गंभीर गुन्ह्यात माढा सबजेलमध्ये अटकेत असलेले सिद्धेश्वर कैचै,अकबर सिद्दाप्ना पवार,आकाश उर्फ अक्षय राॅकी भालकर,तानाजी लोकरे चार सराईत गुन्हेगार ड्युटीवर असलेल्या पोलिसांशी झटापट करून पळून जाण्यात यशस्वी ठरले असून या घटनेमुळे माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.या चारही आरोपीना ताब्यात घेण्यासाठी माढा पोलीस प्रयत्नांची शिकस्त करत असून सर्वत्र कडक नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

बेकायदेशीर हत्यारे जवळ बाळगण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अकबर पवार याने कोठडीतच झटका आल्याचे नाटक केले.त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी अकबर यास कोठडीतून बाहेर काढत असतानाच इतर आरोपींनी पोलिसांशी जोरदार झटापट करण्यास सुरुवात केली.यात हे चारही गुन्हेगार पसार होण्यात यशस्वी ठरले आहेत.

पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या आरोपी आकाश उर्फ अक्षय राॅकी भालकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे तर सिद्धेश्वर कैचै हा मोडनिंब येथील आठवडा बाजारात बनावट नोटा चलनात आणताना सापडला होता.तर तानाजी लोकरे याच्यावर पाॅस्को कायद्यार्तंगत गुन्हा दाखल असल्याने अटकेत होता

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago