ताज्याघडामोडी

SBI कडून ग्राहकांसाठी नोटीस जारी, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम

 स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या सर्व ग्राहकांना नोटीस बजावली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बँकेने खातेदारांना पॅन-आधार कार्ड (पॅन-आधार) लिंक करण्यासाठीची सूचना देण्यात आली आहे. तसेच जे कोणी ग्राहक पॅन आणि आधार कार्ड लिंक करणार नाहीत, त्यांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचा सल्ला देतो. जेणेकरुन त्यांना अखंडित बँकिंग सेवेचा आनंद घेता येईल.

30 सप्टेंबरपर्यंत पॅन-आधारकार्ड लिंक करता येणार

जर तुम्हाला बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं.

पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर अकाऊंट बंद होऊ शकते. तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे येत्या 30 सप्टेंबरपूर्वी पॅन आधार लिकं करुन घ्या, असे बँकेच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

पॅन कार्डसह आधारला कसे लिंक कराल?

पॅनशी आधार जोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. आपण इच्छित असल्यास आपण एसएमएसद्वारे पॅन आणि आधार देखील लिंक करू शकता. यासाठी आपल्याला UIDPAN 12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी PAN> लिहून 567678 नंबरवर किंवा 56161 वर मेसेज पाठवावा.

असे करा ऑफलाईन लिंक

पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago