ताज्याघडामोडी

पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार, लहान मुलासमोर तरुणावर धारदार कोयत्याने सपासप वार

पिंपरी-चिंचवडच्या चिखली भागात भर दिवसा धारधार शस्त्राने वार करत एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली त्यावेळी एक लहान मुलगाही तेथे होता. गेल्या अनेक दिवसात पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा भररस्त्यात एका तरुणाची पूर्ववैमन्यस्यातून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही घटना घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. कानिफनाथ क्षीरसागर या तरुणाची हत्या झाली असून आकाश उर्फ मकसुद विजय जाधव याने भररस्त्यात कोयत्याची त्याच्यावर वार केले.

पुढील दोन दिवसात आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

काय आहे प्रकरणं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कानिफनाथ आणि आरोपी आकाश हे दोघे आधी शेजारी राहत होते. त्यावेळी परिसरातील काही तरुणांनी आकाशला बेदम मारहाण केली होती. यामागे मृत कनिफनाथ असल्याचा आरोपीला संशय होता. या घटनेनंतर आकाशने ते घर सोडलं व तो दुसरीकडे राहायला गेला. मात्र आपल्याला मारहाण झाली व घर बदलावं लागलं याचा राग आकाशच्या मनात होता. याच रागातून आकाशने रविवारी कनिफनाथ याच्यावर हल्ला केला.

रविवारी दुपारी 1.30 च्या दरम्यान कानिफनाथला आकाशने मंडप बांधायचे काम द्यायचे असे सांगून त्याला एकांत स्थळी बोलवलं. त्यानंतर आरोपी आकाश जाधव त्या ठिकाणी आला. रस्त्यात कनिफनाथ एका व्यक्तीसोबत बोलत उभा होता. यावेळी त्याच्याजवळ एक लहान मुलगाही होता. आकाश यावेळी गुपचूप तेथे आला व त्याने पिशवीतून कोयता काढला व कनिफनाथवर हल्ला करू लागला. बेसावध असलेला कनिफनाथ पळू लागला. आकाशदेखील त्याच्या मागे पळत गेला. काही अंतरावर त्याने कनिफनाथवर कोयत्याने सपासप वार केला. त्याचा मृत्यू होत नसल्याचं पाहून आकाशने डोक्यात दगड घालून कनिफनाथची हत्या केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago