ताज्याघडामोडी

रक्तदान  शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 351 जणांनी केले रक्तदान

रक्तदान  शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

351 जणांनी केले रक्तदान

 

        पंढरपूर, दि.09: तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान  शिबिरात 351 रक्तदात्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष रक्तदान केले. या शिबीरामध्ये महिलांनी  उत्स्फूर्त सहभाग घेवून रक्तदान केले. अशी माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली

         कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. गंभीर आजारातील रुग्णांना तसेच अपघातत जखमी होणाऱ्यांना वेळेत रक्त न मिळाल्यास जिवितास धोका होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून  तसेच  समाजाप्रती आपले काही देणे लागते या जाणीवेतून तहसिल कार्यालय पंढरपूर येथे पंढरपूर ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

          यावेळी  जास्ती जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे या आवाहानाला प्रतिसाद देत तहसिल व दुय्यम निंबधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी , पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार , सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे सदस्य, जेष्ठ आदींनी रक्तदान केले. यावेळी हनुमंत भगवानराव मोरे (वय-51वर्षे) यांनी  आतापर्यंत 51 वेळा रक्तदान केले  तसेच त्यांच्या कुटुबांतील सर्व सदस्यांनीही शिबिरात रक्तदान केले. रविराज जाधव व हितेश चव्हाण यांनी लातुर जिल्ह्यातून येवून  रक्तदान केले. तर अनिल यलमार यांनीही आतापर्यंत 78 वेळेस रक्तदान केले. यावेळी रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ  देवून सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन रक्तदान शिबीरात व्यवस्था करण्यात आली होती असेही, श्री बेल्हेकर यांनी सांगितले

    तहसिल कार्यालयात आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीराचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबीरास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे तसेच आयोजकाचे कौतुकही यावेळी केले. तसेच जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनीही शिबीरास  भेट दिली यावेळी तहसिलदार व सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले.               तहसिलदार बेल्हेकर यांनी स्वता: रक्तदान करुन  आपल्या सहकाऱ्यांना यासाठी प्रोत्साहित केले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago