गुन्हे विश्व

नववधू तिसऱ्याच दिवशी झाली लुटारू, दागिने घेऊन ‘असा’ केला पोबारा

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू घरातील दागदागिने लुटून पळून गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पतीला जबर धक्का बसला आहे. एका निवृत्त सैनिकाने पहिली पत्नी वारल्यानंतर मुलांना आईचं प्रेम मिळावं, यासाठी दुसरं लग्न केलं. मात्र लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी या नववधूने मुलांना मारहाण करत घरातील पहिल्या पत्नीचे दागिने घेऊन पोबारा केला.ही घटना आहे राजस्थानची राजधानी जयपूरमधील. रामदयाल यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करावं, यासाठी कुटुंबीय सतत आग्रह करत होते. त्यांचा 14 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षांची मुलगी यांचं पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांना आईचं प्रेम मिळावं, यासाठी त्यांनी घरच्यांना होकार देत लग्न करण्याची तयारी दाखवली. या लग्नासाठी त्यांनी 3 लाख रुपये खर्चही केला. मात्र लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी आलेल्या अनुभवाने रामदयाल यांना धक्का बसला.

या घटनेनंतरही त्यांनी आपली पत्नी रेखाशी संपर्क साधून तिला परत येण्याची विनंती केली. मात्र घरातून पहिल्या पत्नीचे सुमारे 5 लाख किंमतीचे दागिने घेऊन पळून गेलेल्या रेखाने परत यायला नकार दिला. त्यानंतर मात्र रामदयाल यांनी पोलीस स्टेशन गाठत रेखाविरोधात चोरीची आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली.

30 एप्रिल या दिवशी रामदयाल आणि रेखा यांचं जयपूरमध्ये साध्या पद्धतीनं लग्न झालं होतं. त्यापूर्वी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आपल्या मुलांच्या भवितव्याच्या चिंतेत असणाऱ्या रामदयाल यांनी बसमध्ये श्याम सुंदर नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानं आपल्या पाहण्यात एक मुलगी असून ती गरीब कुटुंबातील असल्यामुळे लग्नाचा खर्च तुम्हाला उचलावा लागेल, असं रामदयाल यांना सांगितलं होतं. रामदयाल यांनी ही बाब मान्य करत लग्न करायला तयारी दाखवली. लग्न झाल्यानंतर दोन दिवस रेखा गुण्यागोविंदानं घरी राहिली. मात्र तिसऱ्या दिवशी रामदयाल बाहेर गेल्यानंतर संधी साधत तिनं कपाटात ठेवलेले पहिल्या पत्नीचे दागिने घेतले आणि याबाबत विचारणा करणाऱ्या मुलांना मारहाण करून तिने पोबारा केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago