पंढरपूरातील भाजपच्या बड्या नेत्याच्या शिक्षण संस्थेची होणार चौकशी ?

पंढरपूर शहरातील भाजपाशी संबंधित असलेल्या एका बड्या नेत्याशी संबंधित शिक्षण संस्थेत उच्चं शिक्षीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच महिन्याकाठी लाखो रुपयाचा गंडा घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल टाइम्स ऑफ इंडियामध्ये फायनान्शिअल एडिटर राहिलेल्या व १९९२ मध्ये हर्षद मेहता शेअर घोटाळा उघडकीस आणलेल्या व नुकतेच अदानी उद्योग समूहाच्या चौकशी बाबतची माहिती ट्विट केल्यानंतर ज्यांच्यामुळे अदानी समूहाला हजारो कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला होता. त्या ख्यातनाम पत्रकार सुचेता दलाल यांनी अभियांत्रीकी कॉलेज मधील प्राध्यापकांच्या पगारातून ३० टक्के रक्कम परत घेतली जात असल्याच्या तक्रारीची दखल  घेतली आहे.     

त्यांनी याबाबत ट्विट करत  संस्थेत कर्मचाऱ्यांना पगार दिल्यानंतर रोख स्वरूपात ३० टक्के पगार परत करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.तर राज्याच्या विनाअनुदानित व खाजगी शिक्षण संस्थांसाठी असलेल्या शुल्क नियामक प्राधिकरणाचे अपर सचिव यांनी उच्चं तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकास पत्र लिहून सदर विठ्ठल एज्युकेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीबाबत पुढील कार्यवाही करण्यास सांगितले आहे.   

 

सदर प्राप्त तक्रारीत नमूद केल्यानुसार सिसिटीव्ह फुटेज सह आणखी बरीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणलेल्या,अदाणी समूहामध्ये झालेल्या गुतवणुकीबाबत सुरु असलेल्या चौकशीचा प्रकार उघडकीस आणून गेल्या महिन्यात देशभरात खळबळ उडवून दिलेल्या धाडसी महिला पत्रकार सुचेता दलाल यांनी पंढरपुरातील या प्रकाराबाबत ट्विट करताना महाराष्ट्रातील खाजगी अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये ३० टक्के पगार परत मागितला जाणे धक्कादायक असून संपूर्ण पगाराच्या रकमेचा इन्कम टॅक्स भरणाऱ्या प्राध्यपकांना dte आणि aicte या न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणार का असा प्रश्न ट्विटरवर उपस्थित केला आहे.                  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago