पंढरपुरात तोतया पोलिसांकडून दुकानदार वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगडया लंपास

पंढरपूर शहरातील भक्तिमार्ग येथे छोट्या स्वरूपातील किराणा दुकान चालविणाऱ्या वृद्ध महिलेस दुकानात एकटी असल्याचे पाहून दोन भामट्यानी पोलीस असल्याची बतावणी करीत लुबाडले असल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे भक्ती मार्ग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
  या बाबत दाखल फिर्यादीनुसार पंढरपुर शहरातील भक्तिमार्ग विस्थापित नगर येथील जनकल्याण हाँस्पीटलच्या समोरील बाजूस कालीका नावाचे किराणा व जनरल स्टोअर्स चे दुकान असुन या ठिकाणी सदर वृद्ध महिला या बसल्या असताना दिनांक 29/06/2021 रोजी सकाळी ठीक १०:३० च्या आसपास सदर वृद्ध महिला या दुकानात एकट्याच असल्याची संधी साधत एक 40 ते 42वर्षाचा काऴा सावऴा वर्णनाचा त्याने चौकडा फुल बाहीचा शर्ट व इशर्ट केलेला अनोऴखी इसम त्या ठिकाणी आला.पोलीस आहे असे बोलुन त्याचे कसले तरी ओऴखपञ दाखवले मी ते व्यवस्थित पाहीले नाही नंतर मला तो म्हणाला की आमचे पोलीस अधिकारी दुकाने चेक करणार आहेत तुम्ही सोने जास्त घातले आहे ते काढुन ठेवा नाहीतर ते सोने जास्त आहेत म्हणुन तुम्हाला दंड करतील असे सांगत विश्वास संपादन केला.सदर वृद्ध महिलेकडील दोन्ही सोन्याच्या बांगड्या काढून त्या पिशवीत ठेवल्या त्याच वेळी आणखी एक इसम त्या ठिकाणी आला या दोघांनी मिळून पिशवीस गाठ मारुन परत पिशवी सदर महिलेकडे दिली व ते दोघे तेथुन निघुन गेले नंतर पिशवीत ठेवलेल्या बांगड्या तपासल्या असता त्यात सोन्याच्या बांगड्या ऐवजी काचेच्या बांगड्या दिसून आल्या.
सदर प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ .
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago