शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील हा तिवसा शहरातील आशिर्वाद वाईन बारसमोर रात्री 5 जणांनी यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तिवसा शहरात रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाच जणांच्या टोळक्याने अमोल पाटील (वय 34) वर हल्ला केला आणि हत्या केली. अमोल पाटील हा मित्रासोबत बारमध्ये आला होता. पण बार बंद झाल्याने अमोल पाटील व त्याचा एक मित्र बारसमोर बसले होते. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून 5 आरोपींनी अमोल पाटील यांच्या हल्ला चढवला. डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केलं.
या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली तर 1 आरोपी फरार आहे. धक्कादायक म्हणजे, अमोल पाटील याच्यावर याआधी दोन हत्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता. ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…