ताज्याघडामोडी

मराठा बांधवांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 4 जुलैला मराठा क्रांति आक्रोश मोर्चा

मराठा बांधवांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 4 जुलैला मराठा क्रांति आक्रोश मोर्चा

पंढरपूर : मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरी मध्ये असलेले एसइबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक एक मराठा तरुण बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मराठा समाजावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध समाज बांधवांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने मराठा बांधवांच्या काही मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा 4 जुलै रोजी सोलापूर येथे कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वीच शासनाने या मागण्या मान्य कराव्यात याबाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयास देण्यात आले.

1. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे ही प्रमुख मागणी असून 2. कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद तत्काळ करावी 3. मराठा समाजातील युवकांसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेला तत्काळ एक हजार कोटी रुपये देऊन त्याचे उपकेंद्र सोलापुरात सुरू करावे 4. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधून ते कोणत्याही संस्थेला न देता शासनाच्या नियंत्रणाखाली चालवावे. 5. छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती चालू करण्यात यावी 6. मराठा आरक्षणासाठी ज्या मुलांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये मदत निधी द्यावा या विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, संतोष कवडे, अ. भा. छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर जगताप, दिलीप साबळे, संजय पवार, मराठा महासंघाचे सोलापूरचे सचिव गुरुदास गुटाळ, अ. भा. छावा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण, विनोद लटके, सोमनाथ झेंड, पांडुरंग शिंदे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अमोल पवार, मराठा महासंघाचे शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, बाळासाहेब कोले, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर शेळके, छावा क्रांतीवीर सेनेचे धनाजी लटके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिन गंगथडे, शिवक्रांती युवा संघटनेचे दत्तात्रय काळे, किरण भोसले, संभाजी ब्रिगेडचे स्वागत कदम, संभाजी ब्रिगेड पुणे विभागचे किरण घाडगे, आनंद जाधव, महेश वडणे, मराठा क्रांती मोर्चाचे रामभाऊ गायकवाड, अखिल भारतीय मराठा महासंघ रिक्षा संघटनचे नागेश गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

7 days ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago