समाजसेवेचा बुरखा फाटला,तहसीलदाराने केला खंडणीचा गुन्हा दाखल

पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला स्वातंत्रोत्तर काळात खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले ते निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांनी.१९५० ते १९८० च्या दशकांपर्यत राज्यात जात,धर्म निरपेक्ष भावनेने सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या समाजसेवकांचा मोठा बोलबाला होता.राजकीय पदे,राजकीय प्रतिष्ठा अथवा पैशाचा मोह न धरता अनेक समाजसेवकांनी केलेल्या कार्यामुळे सामाजिक कार्यकर्ता या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त झाली.मात्र पुढे यात बोगस समाजसेवकांचा शिरकाव होऊ लागला आणि हळूहळू समाजसेवक अथवा समाजसेवी संघटनाचा पदाधिकारी हा खरेच समाजसेवेचे काम करतो कि यातून त्याला स्वहित साधायचे आहे याचा अंदाजही सामान्य जनता घेऊ लागल्याचे दिसून आले.मात्र तरीही राज्यात अशा  बोगस समाजसेवकांचा मोठा सुळसुळाट झाला असून कुठल्या तरी संघटनेच्या नावाखाली लेटरपॅड वर शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या विरोधात  सतत तक्रारी करणे यातून दबाव निर्माण करत आर्थिक फायदा करून घेण्याचे प्रकारही राज्यात अनेक ठिकाणी उघडकीस येत आहेत,चर्चिले जात आहेत.मात्र अशा प्रवृत्तीमुळे निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता दीसून येत आहे.समाजसेवक म्हणून मिरवत असताना काही तथाकथित समाजसेवक केवळ विविध शासकीय कार्यालयात तक्रारी देणे एवढाच उद्योग करताना दिसून येतात.अशा प्रवृत्तीकडून नेमके शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात एखाद दिवसाचे आंदोलन करणे,बातम्या लावून घेणे आणि बातमी आली कि पुढे या बातमीची कात्रणे संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून दबाव निर्माण करणे एवढाच उद्योग केला जात असल्याचे दिसून येते.मात्र त्यांनी केलेल्या आंदोलनांचे,उपोषणाचे फलित काय याची माहिती देण्यास मात्र पद्धतशीर टाळाटाळ केली जाते.मात्र कधी कधी एखादा अधिकारी खमक्या भेटला कि अशा तथाकथित समाजसेवकांची पोलखोल झाल्याशिवाय रहात नाही.असंच प्रकार अहमद नगर जिल्ह्यात घडला असून अवैध वाळू उपशाबाबाबत सातत्याने तक्रारी करून थेट तहसीलदारांनाच खंडणी मागणाऱ्या समाजसेवका विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अटक केली आहे.                   

अहमदनगर तालुक्यातील पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीं नुसार अन्याय निवारण समितीचा जिल्हाध्यक्ष हा तालुक्यातील अवैध वाळू उपशाबाबत व तहसील कार्यालयातील कामकाजाचा बाबत  सातत्याने तक्रारी करत होता व त्या बाबतच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या तहसीलदाराच्या व्हाट्स अप वर टाकून अपरोक्षपणे पैशाची मागणी करत होता.या विरोधात तहसीलदार वैशाली देवरे यांनी पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली होती.सोमवारी अरुण रोडे हा पैसे नेण्यासाठी तहसील कार्यालयात आला असता पोलिसांनी त्यास रोख रकमेसह रंगेहाथ पकडले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                                       

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago