गुन्हे विश्व

धक्कादायक! मनोरुग्ण मुलाकडून आई-वडिलांना अमानुष मारहाण; आईचा मृत्यू तर वडील कोमात

बीड : मनोरुग्ण असणाऱ्या एका मुलानेच आपल्या आई वडिलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना अमानुष मारहाण केली. दुर्दैव म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत होते पण त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते.

दरम्यान, या अमानुष मारहाणीनंतर अखेर वृद्ध आईने प्राण सोडला. तर वडील गंभीर आहेत. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील घटशीळ पारगाव येथे शनिवारी सायंकाळी घडली. त्र्यंबक खेडकर आणि शिवबाई खेडकर हे गावातच राहतात. त्यांना बाबासाहेब नावाचा मुलगा आहे. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे.

शनिवारी सायंकाळी या मुलाने वृद्धांना अमानुष मारहाण केली. रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वृद्ध आईचा मृत्यू झाला तर वडील कोमात आहेत. या प्रकरणी अद्याप कसलीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही.

मारहाण होत असताना वृद्ध दाम्पत्य मदतीची याचना करत होते, यावेळी मदत मिळाली असती तर वृद्धेला जीव गमवावा लागला नसता. मात्र ग्रामस्थ मदतीऐवजी व्हिडीओ काढत बसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

8 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago