जागेचा उतारा देण्यासाठी आणि सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वेल्हा तालुक्यातील कोदवडी गावच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मुकुंद त्रिंबकराव चिरटे (वय 34. रा. नसरापूर ता. भोर, तलाठी कोदवडी वेल्हा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या संस्थेनी 20 गुंठे जागा दामगुड आसनी, वेल्हा येथे विकत घेतली आहे. खरेदी करण्यापूर्वी संबंधीत जागेचा उतारा देण्यासाठी व खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी चिरटे याने 10 हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रादाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा केली असता, तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार एसीबीने सापळा रचून 8 हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहात पकडले
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…