गुन्हे विश्व

शूटिंग काढा’ म्हणत तरुणाने मारली पुलावरून उडी

मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा’ असे सांगत एका तरुणाने दारणा नदीच्या पुलावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात येऊन वाचवण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवार (दि. १४) दुपारी तीनच्या सुमारास विकास विनायक लाखे (१९) रा. भोर मळा, सिन्नरफाटा नाशिकरोड याने चेहेडी येथील दारणा नदीच्या नवीन पुलावरून पूर्व दिशाने नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी त्याला वाचवण्याचा कसोशिने प्रयत्न केला.उडी मारण्यासाठी त्याने पुलाच्या कठड्याला धरुन उडी मारत असताना ‘माझी शूटिंग काढा’ असे नदीत असलेल्या लोकांना ओरडून सांगत हात सोडून नदीतील पाण्याच्या डबक्यात उडी मारली.

हा प्रकार पाहणार्‍या नागरिकांनी धावत जाऊन त्याला बाहेर काढले. पळसेचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यावर बिट मार्शल रवींद्र खोंडे, नितीन पाचोरे, विनायक भरसट आदी स्थानिकांच्या मदतीने संंबंधित व्यक्तीस बाहेर काढत उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago