Categories: Uncategorized

ओबीसी आरक्षण प्रश्नी आ.गोपीचंद पडळकर यांची पंढरपूर वडार समाजसमवेत बैठक ओबीसी आरक्षण,रॉयल्टी मुक्त गौण खनिज,आर्थिक विकास महामंडळ आदींबाबत चर्चा

ओबीसी आरक्षण प्रश्नी आ.गोपीचंद पडळकर यांची पंढरपूर वडार समाजसमवेत बैठक
ओबीसी आरक्षण,रॉयल्टी मुक्त गौण खनिज,आर्थिक विकास महामंडळ आदींबाबत चर्चा
ओबीसी आरक्षण प्रश्नी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात घेतलेल्या वडार समाज बांधवाच्या बैठकीत राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षण प्रश्नी आपली भूमिका मांडली व वंचीत घटकांना सत्तेत सहभागी होण्यासाठी हे आरक्षण कसे गरजेचे आहे हे पटवून दिले.यावेळी उपस्थित वडार समाजातील नेत्यांनी वडार समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांची माहिती आमदार पडळकर याना दिली.वडार समाज हा कष्टकरी समाज आहे,या समाजाला पारंपरिक व्यवसायासाठी दगड,वाळू,मुरूम याची दोनशे ब्रास उपलब्धता रॉयल्टी मुक्त करण्यात यावी.महावीर नगर परिसरात वडार समाजाच्या समाज मंदिराची अनेक वर्षाची मागणी आहे ती पूर्ण व्हावी,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजासाठी वार्षिक शंभर कोटी रुपयांची घोषणा केली होती,त्यासाठी तरतूद व्हावी,वडार समाज बांधवाना वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून घरकुले मिळावीत अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी निवेदनाद्वारे केली.या बैठकीत बोलताना वडार समाजाच्या सर्व प्रशांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
यावेळी वडार समाजातील माजी नगरसेवक साहेब चौगुले,अंबादास धोत्रे, दयाघन महाराज ,माजी नगरसेवक मोहन पवार, अण्णासाहेब काळे, गफूर धोत्रे,दत्ता भोसले,पिंटू बाबा पवार, राजू धोत्रे, दत्तात्रय भोसले ,शंकर चौगुले ,महादेव धोत्रे,अर्जुन पवार, रवी चौगुले,भारत चौगुले,प्रकाश चौगुले,अण्णा जाधव,नवनाथ पवार,पिराजी धोत्रे,शुभम इटकर,दत्तात्रय धोत्रे,किशोर चौगुले,दत्ता शिंदे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी नगरसेवक अंबादास धोत्रे यांनी आभार मानले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 hour ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago