ताज्याघडामोडी

“मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा,आमच्यामध्ये सामील व्हा,”; गडचिरोलीत नक्षलवादी संघटनेकडून पत्रक जारी

गडचिरोली : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. सर्व पक्ष या प्रश्नावर बोलत असताना या आरक्षणाच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. ‘मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा,’ या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. ‘आमच्यामध्ये सामील व्हा,’ असे आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केले आहे.

हे सरकार केवळ अंबानी-अदानीचं आहे, त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा असे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्मितीची आठवण करुन देत मराठा तरुणांना भावनिकदृष्ट्या आकर्षित करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याआड नक्षलवादी नवा डाव रचत आहेत. नक्षलीवादी या आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

नक्षलवाद्यांच्या पत्रकात म्हटले आहे की, ‘मराठा समाजातून मूठभर जे दलाल भांडवलदार निर्माण झाले आहेत, तेच खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. या अधोगतीचं स्वरुप सामाजिक नसून आर्थिक आहे. या आर्थिक अधोगतीला कारणीभूत सरकारांचे आजवरचे धोरणे आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे.’

‘शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतला होता, पुन्हा पुढाकार घ्यायची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. शत्रू, व्यवस्थेचे रखवाल, साम्राज्यवादाचे दलाल सत्ताधारी वर्ग आहेत. मित्र, सर्वच समाजातील गोरगरीब जनता आहे.

मैदानात माओवादी शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने तयार आहेत. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी मैदानात उतरावे. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत,’ असेही नक्षली संघटनेने या पत्रकात म्हटले आहे.

मराठा समाजाचे एवढे वाईट दिवस आले आहेत का? नक्षली संघटना आम्हाला सांगते आम्ही कायद्यावरचा विश्वास सोडून त्यांच्यामध्ये सामील व्हावे. आम्हाला न्याय हक्क मिळवायचा आहे. आम्हाला कायद्यावर विश्वास आहे. वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करु. न्यायालयीन लढाई लढून आणि आमचं आरक्षण किंवा पर्यायी व्यवस्था मिळवू, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago