गुन्हे विश्व

भरदिवसा बांधकाम ठेकेदारावर गोळीबार; थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे – वारजे भागात एका बांधकाम ठेकेदारावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. बांधकाम ठेकेदार पळाल्याने बचावला. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.

हल्लेखोर सीसीटिव्हीत टिपले गेले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. रवींद्र सखाराम तागुंदे (36 , रा. वारजे) असे बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे.

तागुंदे याचे वारजे भागातील वंडर फ्युचरा इमारतीत कार्यालय आहे. तो बांधकाम ठेकेदार असून जमिन विक्रीचा व्यवसाय करतो.

शनिवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास तो कार्यालयात आला. त्यावेळी मुंबई-बंगळुरू बाह्‌यवळण मार्गावरून दोन दुचाकीवरून चौघे हल्लेखोर तागुंदेच्या कार्यालयासमोर आले. तागुंदे कार्यालयाबाहेर थांबला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर कामगार होते. काही वेळानंतर कामगार तेथून गेले.

हल्लेखोरांनी तांगुदेच्या कार्यालयासमोर दुचाकी लावली. काही कळायच्या आत पिस्तुलातून दोन गोळ्या हल्लेखोरांनी तांगुदेच्या दिशेने झाडल्या. गोळीबार झाल्यानंतर तो घाबरला आणि पाठीमागील बाजूस असलेल्या टेकडीच्या दिशेने धावत सुटला.

हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोरांनी तागुंदेच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून बाह्‌यवळण मार्गावरून वारज्याच्या दिशेने पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी घटनास्थळी भेट दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago