ताज्याघडामोडी

कोरोनाची लस घेतलेल्या एकाही कोरोना बधिताचा मृत्यू नाही 

कोरोना लसीचा डोस  घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.एम्सच्या टीमने  एप्रिल आणि मे महिन्यात केलेल्या पाहणीत हे निष्कर्ष पुढे आले आहेत.या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या स्टडीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू झाला नाही.या अभ्यासात म्हटलं गेलं, की लसीचे डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. एम्सनं ब्रेक थ्रू इन्फेक्शनच्या तब्बल 63 प्रकरणांचा जीनोम सिक्वेंसिंगच्या माध्यमातून अभ्यास केला. यातील 36 रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर, 27 जणांनी एक डोस घेतला होता. यातल्या 10 जणांनी कोविशील्ड लस घेतली होती. तर, 53 जणांनी कोव्हॅक्सिन घेतली होती. यातील कोणत्याही रुग्णाचा कोरोनाबाधित होऊनही मृत्यू झाला नाही.

या स्टडीमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींचं साधारण वय 37 वर्ष होतं. सर्वात कमी वयाचा व्यक्ती 21 वर्षाचा होता. तर, सर्वात वृद्ध व्यक्तीचं वय 92 वर्ष होतं. यात 41 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश होता. कोणत्याही रुग्णाला आधीपासूनच कोणता गंभीर आजार नव्हता. लसीकरणाबाबत अजूनही लोकांमध्ये जागरुकता नाही. मात्र, कोरोनाच्या लशीपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. क्लिनिकल ट्रायलमध्येही लस सुरक्षित असल्याचं घोषित केलं गेलं आहे. त्यामुळे, कोरोनापासून बचावासाठी लस घेणं अत्यंत आवश्यक आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

15 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago