ताज्याघडामोडी

आता एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल WhatsApp, कंपनीकडून Multi Device Support ची घोषणा

जगभरात सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या अ‍ॅप्सपैकी एक असलेले WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमी नवीन-नवीन फीचर्स आणत असते. परंतू काही फिचर्स अद्यापही व्हाट्सअ‍ॅपवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे युजर्सकडून त्याची वांरवार मागणी होत असते. यापैकीच एक फिचर म्हणजे एकच व्हाट्सअ‍ॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. युजर्सची ही गरज ओळखून व्हाट्सअ‍ॅप काम करत असून लवकरच Multi Device Support च्या माध्यमातून ही मागणी पूर्ण होत आहे. तसेच Disappearing Mode आणि View Once हे फीचर देखील WhatsApp मध्ये दिसणार आहेत. एकापेक्षा जास्त फोन्स वापरणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वरदान ठरणार आहे.

व्हाट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचर्सची माहिती WABetaInfo वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइटने WhatsApp चे CEO Will Cathcart यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी आगामी फीचर्सची माहिती समोर आली. कंपनीच्या सीईओनी सांगितले कि, व्हाट्सअ‍ॅप Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once हे फीचर लवकरच रोलआउट केले जातील. प्राप्त माहितीनुसार युजर त्यांचे व्हाट्सअ‍ॅप अकाउंट एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरू शकतील. यापूर्वी एका स्मार्टफोनमधील व्हाट्सअ‍ॅप नंबरने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केल्यावर जुन्या फोनवरील अकॉउंट बंद होत असे.

तसेच डिसअपेरिंग फीचर अंतर्गत ठरविक वेळेत एखाद्या व्यक्तीला पाठवलेले मेसेजेस आपोआप गायब होतात. हे फीचर आता लवकरच व्हाट्सअ‍ॅप युजर्सना पण मिळणार आहे. तसेच व्हाट्सअ‍ॅप व्यू वन्स फीचर देखील लवकरच रोलआउट होणार आहे यात पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ मेसेज मिळवणारा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. त्यानंतर तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा पाहता येत नाही. या फिचरविषयी अधिक माहिती समोर आली नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago