ताज्याघडामोडी

सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

          पंढरपूर, दि. 05:-  शेतकऱ्यांचे  जीवनमान उंचवण्यासाठी शेळी व मेंढी पालन व्यवसायास  चालना देणे आवश्यक आहे. यासाठी जगात जास्त दुध देणारी सानेन बकरीचे पैदास केंद्र महाराष्ट्रात उभारणाण्यासाठी  प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्र, महुद ता.सांगोला येथे भेट देवून पाहणी केली दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एन.ए.सोनवणे,  प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.बोरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्राचे संचालक डॉ.शशांक कांबळे, सहाय्यक आयुक्त डॉ.एस.एस.भिंगारे, तसेच परिसरातील शेळी, मेंढी पालक उपस्थित होते.

यावेळी श्री. केदार म्हणाले,  शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी उच्च प्रतीच्या शेळया व मेंढयाची पैदास करुन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.  पशुधन निरोगी  रहावे, आजारी  पशुधनाला जागेवरच उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथकासह फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना पशुधनावरील उपचाराची सुविधा दारातच मिळणार आहे.

मेंढीच्या माडग्याळ जातीचे वजन लवकर वाढत असल्याने  जातीचे पैदास केंद्र उभारण्यासाठी  आवश्यकती कार्यवाही करावी. विमा काढलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाई तात्काळ मिळेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनांही  पशुसवंर्धन मंत्री केदार यांनी यावेळी दिल्या. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.कांबळे यांनी प्रकल्पातील शेळी, मेंढी पालन, वैद्यकीय सुविधा, चारा आदी सुविधेबाबत माहिती दिली. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

7 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago