गुन्हे विश्व

‘मी आत्महत्या करत आहे’, असा मित्राला मेसेज पाठवून पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने घेतला गळफास

औरंगाबाद : जीवलग मित्राला मध्यरात्री, मी आत्म्हत्या करत आहे, मित्राकडे 18 हजार रुपये आहेत, त्याच्याकडून घेऊन ते वडिलांना देऊन टाक, असा मेसेज करुन एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी क्रांतीचौक पोलिस कॉलनीत हा प्रकार समोर आला. किरण शेषराव मोरे, 24 असे त्याचे नाव आहे.

सिल्लोड ग्रामिणला हेड कॉन्स्टेबल असलेले शेषराव मोरे सद्या पत्नीसह सिल्लोडला बदली झाल्याने तिकडे स्थलांतर झाले.

त्यांच्या नावे असलेले पाेलिस कॉलनीत घरात किरण राहत होता. त्यांचा मोठा मुलगा नोकरी करतो. किरण देखील नेहमी सिल्लोडला ये-जा करत हाेता. रविवारी मध्यरात्री किरणने त्याच्या जवळच्या मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला. त्यानंतर दुसरा मेसेज पैशा संदर्भात केला. परंतू त्यावेळी मित्र झोपलेला होता. सकाळी उठल्यानंतर त्याने मेसेज पाहताच त्याने त्याच्या घराकडे धाव घेतली. मात्र, किरण लटकलेल्या अवस्थेत आढळला.

त्यानंतर जवळच असलेल्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात त्यांनी धाव घेऊन हा प्रकार सांगितला. वरीष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. किरणच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दोन वर्षांपुर्वीच त्याला वडिलांनी दुचाकी घेऊन दिली होती. मात्र, तो रागिट स्वभावाचा होता, त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक फौजदार एजाज शेख अधिक तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago