गुन्हे विश्व

चारित्र्यावर संशयावरून पत्नीची हत्या,पतीनेही केली आत्महत्या

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केला आहे. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. उषा योगेश गायकवाड (वय 28) आणि योगेश तानाजी गायकवाड (वय 33) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा आणि योगेश यांचा 13 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 10 आणि 8 वर्षाची दोन मुले आहेत. उषा घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवात होती. योगेश काहीही काम नसल्यामुळे घरीच बसून होता. दरम्यान, योगेश हा सारखा पत्नी उषाच्या चारित्र्यवर संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते.

सोमवारी रात्री त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. रात्री मुले झोपल्यानंतर योगेश गायकवाड यांनी गळा आवळून पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी मुले जेव्हा झोपेतून उठली तेव्हा त्यांना वडील छताला लटकलेल्या अवस्थेत दिसले तसेच आई निपचित पडली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago