ताज्याघडामोडी

अबब ! 500-2000 च्या नोटांचा खच, कुख्यात गुंडाच्या घरात दोन नंबरचा पैसा? व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सर्वसामान्य माणूस आयुष्यभर मेहनत करुन थोडीफार रक्कम आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी शिल्लक ठेवू शकतो. पण नोटांचे बंडल किंवा घबाड घरात साठवू शकत नाही. त्यामुळे एखाद्याच्या घरात नोटांचं घबाड आढळलं तर ती सर्वसामान्य गोष्ट अजिबात नाही. त्यामुळेच मुंबईचा एक कुख्यात गुंडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या गुंडाचं नाव शम्स अली सय्यद उर्फ जॉनी असं आहे. त्याने घरात 500 आणि 2000 च्या नोटांचे बंडल पसरवून ठेवल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यापैकी एक बंडल तो मुलीच्या हातात खेळण्यासाठी देतो. संबंधित व्हिडीओत ते स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होतोय.

शम्स अली सय्यद उर्फ जॉनी याने स्वत: याबाबतचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. थोड्या वेळाने त्याला आपली चूक लक्षात आली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कारण अनेकांनी तो व्हिडीओ व्हायरल केला होता. शम्सला काही दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मात्र, या नव्या व्हिडीओमुळे तो पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला आहे.

शम्स अली सैयद कोण आहे ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय शम्स ह्याने गुन्हे क्षेत्रात वयाच्या 16 व्या वर्षी प्रवेश केला. त्याच्यावर सध्या चेन स्नॅचिंग, लूट, फसवणूक आणि हत्या करण्याच्या प्रयत्न सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याच कुटुंबातून मिळाली आहे. कारण त्याचे वडील समीर अली सैयद उर्फ डिग्गीवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. डिग्गीने सप्टेंबर 2020 मध्ये क्रॉफर्ड मार्केट जवळ कॅफे जनतामध्ये अनियंत्रित गतीने कार चालवून 5 जणांवर चिरडलं होतं.

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि वर्तमान !

शम्स ह्याला ताहा डोसा याच्यावर जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जमीन मिळाला आहे. त्याने 7 मे 2021 रोजी चाकूने डोसावर हल्ला केला होता. त्यानंतर त्याच्यावर जेजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याच्या दोन साथीदारांना सुद्धा जमीन मिळाला आहे. या प्रकरणी पीडित डोसाने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितली होती.

पीडित डोसाची प्रतिक्रिया

‘रमजानच्या महिन्यात मी रात्री 11 वाजता आपल्या कामावरून परत आलो होता. मी घराजवळ बेकरीवर ब्रेड घेण्यासाठी गेलो तेव्हा माझा मित्र दानिश सुपारीवालासोबत बोलत होता. त्याचवेळी शम्स तिथे आला आणि त्याने मला शिवीगाळ द्यायला शुरुआत केली. त्याने मैदान जवळ यायचं नाही, अशी धमकी दिली. नंतर तो त्याच्या ३ साथीदारांसोबत परत आला. त्याने चाकूने हल्ला केला’, अशी माहिती डोसाने दिली होती.

या हल्ल्यात डोसाच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्यांना ज्यादिवशी जामीन मिळाला तेव्हा त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला होता. मात्र, पोलिसांनी त्याला नोटांचे बंडल कुठून आणले, त्याचा तपसील देण्याबाबत नोटीस पाठवली आहे. जेजे मार्ग पोलिसांनी त्याला मिळालेल्या जामीनबाबत उच्च न्यायालयात अपील केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago