पंढपुरात दातेंच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला,दुचाकी घेऊन चोरटा पसार

गेल्या दीड महिन्यापासून पंढरपुर शहरात कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी होत असतानाच शहरात मोटार सायकल चोरीच्या घटनात मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे.पंढरपुर शहरातील रस्ते सामसूम असल्याचा फायदा उठवत चोरटे आपला कार्यभाग साधत असून पंढरपुर शहरातील मनीषा नगर येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक सौरभ विक्रम दाते हे कुटूंबासहीत पुणे येथे गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडे तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
 या बाबत पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पंढरपुर शहरातील मनीषा नगर परिसरात फिर्यादी सौरभ विक्रम दाते हे कुटूंबासह राहतात.त्यांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय असून या निमित्ताने त्यांना वारंवार बाहेर गावी जावे लागते.फिर्यादी आणि त्यांचे कुटूंबीय हे पुणे येथे गेले असता २७ मे रोजी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेचा त्यांना फोन आला व घराच्या आवारात लावलेली दुचाकी आढळून येत नसल्याचे सांगितले.सदर माहिती मिळताच फिर्यादीने फोन करून गोपाळपूर येथील शेतातील आपल्या कामगारास घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितले असता त्याने घरी जाऊन पाहणी केली. त्यावेळी आवारातील एक मोटार सायकल गायब असून घराचे दारही उघडे असल्याचे सांगितले.हि माहिती मिळताच फिर्यादी हे कुटूंबासहित पंढपुरात आले असता त्यांना सर्व कपाटे उघडी दिसली तसेच साहित्य कपडे अस्ताव्यस्थ पडलेल दिसले व घराचा मागील दरवाजा उघडा दिसला.
या प्रकरणी फिर्यादी सौरभ विक्रम दाते रा.मनिषानगर पंढरपूर यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago