ताज्याघडामोडी

कुटूंबातील वादातून मुबंईत आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुलाच्या कठड्यावर चढून आत्महत्येच्या तयारीत असलेल्या एका महिलेचे प्राण वाहतूक शाखेच्या एका दक्ष कर्मचाऱ्यामुळे वाचले असून आत्महत्येचा प्रयत्न करणारी हि महिला एका आमदाराची पत्नी असल्याची माहिती पुढे आली आहे.  

  टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचं (Mankhurd traffic police) नियोजन करत होते. त्याचवेळी एका दुचाकी चालकानं एका महिला ब्रीजच्या कठड्यावर चढली असून ती रडत असल्याची माहिती पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल ढगे यांना तातडीनं घटनास्थळी पाठवण्यात आलं. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द पोलीस स्टेशन तसंच नवी मुंबई पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचल्यावर ढगे यांनी संवदेनशीलता लक्षात घेऊन महिलेशी चर्चा करुन युक्तीनं खाली उतरवत आत्महतेपासून परावृत्त केलं. त्यानंतर त्या महिलेला मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिथे पोलिसांनी चौकशी केली असता आपण आमदाराची पत्नी असल्याचं त्या महिलेनं सांगितलं. कौटुंबिक वादामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. त्यानंतर आमदाराच्या पत्नीला नवी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago