गुन्हे विश्व

आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण

करोनाच्या पहिल्या लाटेतून विश्रांती मिळतेन् मिळते तोच दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं. त्यामुळे पहिल्या फळीतील कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे, असं असलं तरी दुसरीकडे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना विरार पूर्वमध्ये घडली आहे. येथे असलेल्या बालाजी रुग्णालयात एका रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार पूर्वेला बालाजी हॉस्पिटल आहे. शनिवारी एक महिला रुग्ण आपली कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेली होती.दरम्यान, चाचणी करताना या रुग्णाच्या नाकात आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारी स्टिक तुटल्याचे समजले. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचा समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांला पकडून मारहाण करण्यात आली.

ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे शुटिंग नातेवाईकांनीच केलं असल्याचं व्हिडीओतून येणाऱ्या आवाजावरून कळत आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक केलेली नसल्याची माहिती विरार गुन्हे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

5 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago