गुन्हे विश्व

दुहेरी हत्याकांड; शुल्लक भांडणावरुन दोन सख्ख्या भावांची हत्या

बीड : शुल्लक भांडणाच्या कुरापतीवरून झालेल्या भांडणात दोन सख्ख्या भावांची हत्या झाली आहे. या घडनेनं बीडमध्ये खळबळ माजली आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या नागापूर या छोट्याशा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणातील आरेापी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जुन्या भांडणाची कुरापत काढत मोबाईलवरून शिवीगाळ करणार्‍या तरूणाच्या घरच्यांना सांगण्यासाठी दोन भाऊ शेतातून गावात आले. शेतातून गावात आलेल्या दोन भावांवर संबंधित तरूणाने कुर्‍हाडीने हल्ला चढवत सपासप वार केले. या हल्ल्यात एका भावाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची थरारक घटना नागापूर येथे सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणातील आरोपी परमेश्वर साळुंके फरार आहे. सदरच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.बीड तालुक्यातील नागापूर येथील परमेश्वर साळुंके आणि राम आत्माराम साळुंके, लक्ष्मण आत्माराम साळुंके यांच्यात गेल्या महिनाभरापुर्वी किरकोळ भांडण झाले होते. सदरचे भांडण हे गावपातळीवर ज्येष्ठांच्या मदतीने सोडवण्यात आले होते. विशेष म्हणजे एक महिना यांच्यात कुठलीही कुरबुर झाली नाही.

दरम्यान, सोमवारी रात्री परमेश्वर साळुंके याने राम आणि लक्ष्मण यांना फोन करुन शिवीगाळ केली. त्यामुळे राम, लक्ष्मण ही दोन्ही भावंड परमेश्वर शिवीगाळ करतो म्हणून त्याच्या आई, वडिलांना सागंण्यासाठी शेतातून गावात आली. परमेश्वर घरापासून हाकेच्या अंतरावर कुर्‍हाड घेवून उभा होता. राम, लक्ष्मण घराच्या दिशेने येत असल्याचं दिसताक्षणी परमेश्वरने आपल्या हातातील कुर्‍हाडीने दोघांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित हल्ल्यात राम आणि लक्ष्मण दोघेही रक्तबंबाळ झाले. घटनास्थळीच राम याचा मृत्यू झाला तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले. परंतु, उपचारा दरम्यान दुसर्‍या भावाचाही मृत्यू झाला.

दोन्ही भावांच्या हत्येमुळे गावात भितीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणातील आरेापी परमेश्वर साळुंके हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 hour ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago