ताज्याघडामोडी

स्टेट बँकेने बदलले हे नियम, बँकेत जाण्यापूर्वी आधी हे जरुर जाणून घ्या…

मुंबई : देशात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तथापि लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या सेवांविषयी काही बदल केले आहेत. एसबीआयने आता शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेतही बदल केला आहे. तसेच बँक आता निवडक काम करेल. आता सामान्य कामे केली जाणार नाहीत. 

एखादे महत्वाचे काम असेल तरच बँकेत जा

ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, SBI बँक ग्राहकांनी केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी शाखेत भेट द्यावी. तसेच बँकेच्या शाखा दुपारी अडीचपर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत सकाळी 10 ते पहाटे 1 दरम्यान ते  बँकेत गेले तर तुमचे काम होईल. 

बँक उघडण्याची वेळ बदलली

SBI शाखा आता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उघड्या राहतील. मित्रांनो, नवीन अधिसूचनेत स्पष्टपणे सांगितले आहे की बँकेची प्रशासकीय कार्यालये आणि 50 टक्के कर्मचारी यांच्यासह संपूर्ण बँकिंग तास पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील.

मास्कशिवाय बँकेत प्रवेश नाही

बँक शाखेत जाणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावायलाच हवा नाहीतर त्यांना आत जाऊ देणार नाही. इतकेच नव्हे तर आता एसबीआयने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार बँकेत फक्त 4 कामे होणार आहेत.
1. रोख ठेव आणि पैसे काढणे
2. चेक संबंधित कामे
3. डीडी अर्थात डिमांड ड्राफ्ट / आरटीजीएस / एनईएफटीशी  संबंधित काम
4. शासकीय चलान

बँकेची फोन सेवा वापरा

ग्राहक एसबीआय (SBI) फोन बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. एसबीआय फोन बँकिंगसाठी प्रथम नोंदणी करावी लागेल. यानंतर संकेतशब्द  (पासवर्ड) तयार करावा लागतो. ग्राहक संपर्क केंद्राद्वारे फोनवर  दिलेल्या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

12 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago