ताज्याघडामोडी

कोरोना लसींचा तुटवडा संपणार, केंद्र सरकार आणखी 5 लसींना मंजुरी देण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतात सध्या दररोज दोन ते तीन लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. काही राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. देशात सध्या कोरोनाबाधित संख्या नियंत्रणात येत असली तरी रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी भारत सरकारननं सध्या तीन लसींच्या वापराला परवानगी दिलेली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक वी या तीन कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे.

येत्या काळात आणखी पाच लसींच्या वापरांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

पुढील सहा महिन्यात 216 कोटी लसी उपलब्ध होणार

कोविड-19 मुळे भारतात आतापर्यंत 2 लाख सत्तर हजार व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं नीति आयोगाचे सदस्य वी.के. पॉल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबर पर्यंत भारताला 216 कोटी डोस उपलब्ध होतील असं म्हटलं होतं. यासाठी भारत सरकार येत्या काळात आणखी काही लसींना परवानगी देण्याची शक्यता आहे. यामध्ये परदेशातील काही आणि काही भारतीय लसींचा समावेश असू शकतो.

कोणत्या नव्या लसी उपलब्ध होणार

झायडस कॅडिला

भारतामध्ये झायडस कॅडिला ची लस तयार होत आहेय केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी एक ट्विट करुन या विषयी माहिती दिली होती. झायडसच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. झायडसनं कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मंजुरी मिळाली की लगेच उत्पादनाला सुरुवात करु , असं म्हटलं आहे. झायडसद्वारे या वर्षी 5 कोटी लसी बनवू असं सागंण्यात आलं आहे.

नोवावॅक्स

अमेरिकेची कंपनी नोवावैक्‍स वॅक्सिनची निर्मिती करत आहे. त्याच कंपनीच्या फार्म्युलावर भारतात कोवावॅक्स नावाची लस तयार करण्याचं काम सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही लस लाँच होईल, असा अंदाज आहे.

बायोलॉजिकल ई वॅक्‍सिन

हैदराबादमधील कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड (BE) हे वॅक्सिन तयार करत आहे. ही वॅक्सिन सध्या फेज-3 ट्रायल मध्ये आहे. लवकरचं त्याचं उत्‍पादन सुरु होण्याची आशा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या वॅक्सिनचे ३० कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध होणार आहेत. कंपनीनं त्यांची लस सर्वात कमी किंमतीची असेल, असा दावा केला आहे.

भारत बायोटेक नोजल वॅक्सिन

ही नाकावाटे दिली जाणारी लस आहे. भारत बायोटेक या लसीची निर्मिती करत आहे. याच्या क्लिनिकल ट्रायलसाठी डीजीसीआयकडे परवानगी मागण्यात आली आहे. याच्या ट्रायल अद्याप सुरु झालेल्या नाहीत.

जेनोवा

पुणे येथील जेनोवा फार्मास्युटिकल देखील लस बनवत आहे. लवकरच जेनोवा फार्मास्युटिकलला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

7 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago