लॉकडाऊनमुळे पंढरपुरातील रस्ते निर्मनुष्य,मोटारसायकल चोरांचा कारनामा सुरू

पंढरपुर शहर तालुक्यात १५ एप्रिल पासून लॉकडाऊनची कडक अमलबजावणी सूर असतानाच अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी दिलेली सकाळी ७ ते १ ची वेळ वगळता इतर वेळी संपूर्ण शहरातील रस्ते जवळपास निर्मनुष्य असल्याचे दिसून येत आहे.याचीच संधी साधत मोटारसायकल चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत असून गेल्या काही  दिवसात शहरातून ४ मोटार सायकल चोरीस गेल्याची फिर्याद पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.
    पंढरपुर शहरातील प्रतिथयश डॉक्टर भागवत कानडे रा.उमदे गल्ली पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्पेल्डंर प्रो. मोटार सायकल क्र.MH-13/AY-6497  हि राहते घरापासून चोरीस गेली आहे.
    इसबावी येथील बालनसार शेख या गॅरेज व्यवसायिकाच्या मालकीची  HFडिलक्स मोटार सायकल क्र.MH-13/CD 8496 हि मोटार सायकल दिनांक १४ मे रोजी भरदुपारी १२ ते १२.३० दरम्यान चोरटयांनी मेकॅनिकल चौक येथून लंपास केली आहे.
      तिसऱ्या घटनेत अनवली ता.पंढरपूर येथील महादेव नामदेव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काळ्या रंगाची लाल पांढ-या पट्ट्याची शाईन क्र.MH-13/BU 5742 हि रुक्मिणी पोलीस संकुल येथे लावली होती.फिर्यादी महादेव जगताप यांच्या मावशीवर पोलीस संकुल येथील कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते.13/05/2021 रोजी रुग्णाची तब्येत खालावल्यामुळे तातडीने अँब्युलन्स बोलवून रुग्णास सांगली येथे उपचारासाठी नेणे भाग पडले.या दरम्यान चोरटयांनी पोलीस संकुलाच्या गेटसमोर लावलेली काळ्या रंगाची लाल पांढ-या पट्ट्याची शाईन हि दुचाकी लंपास केल्याचे दिसून आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
      तर चौथ्या घटनेत  दत्ताञय बऴीराम पाटील व य34 वर्ष धंदा शेती रा देवडे ता- पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दि.13/05/2021रोजी राञौ 08/00 वाचे सुमारास फिर्यादी दत्तात्रय पाटील हे लाईफलाईन हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या आईस जेवणाचा डबा घेऊन आले होते.यावेळी त्यांनी आपली मोटारसायकल एच एफ डिलक्स आर. टी. ओ क्र. MH-13-BT- 0436 हि लाईफलाईन हॉस्पिटलच्या आवारात लावली होती.रात्री ८ ते १० या दरम्यान अज्ञात व्यक्तीने सदर मोटार सायकल चोरून नेली आहे.
मोटार सायकल चोरीच्या या घटनांमुळे पंढरपूर शहरातील नागिरकांनी सतकर्ता बाळगणे गरजेचे झाले असून रस्तयावरील वर्दळ कमी झाल्याने मोटारसायकल चोर या संधीचा फायदा उठवत असल्याचे दिसून येते.           
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

24 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago