मुख्यमंत्री तळमळीने सुचना करीत असताना प्रशासनाने हलगर्जीपणा करु नये-आ.तानाजी सावंत

 शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत यांच्या दौर्‍याने शिवसैनिकात चैतन्य

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे या कठीण काळात अतिशय तळमळीने काम करत आहेत. प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यात समन्वय साधत कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रातील जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तर कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी कुठलीही कमतरता भासू नये यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्क करुन माहीती घेत आहेत.कुठे उणीव जाणवत असेल तर राज्य सरकारच्या पातळीवर ती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.राज्यावर आलेल्या या भयानक संकट काळात राज्याचा सेनापती म्हणून मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे देत असलेला लढा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने कुठलीही उणीव ठेवू नये असे आवाहन शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे.बुधवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करुन विविध तालुक्यातील प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी यांना केले आहे.तर त्या त्या तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या संकटकाळात जनतेच्या संपर्कात राहून काम करीत आहेत.जनतेच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत हे लक्षात अधिकारी आणि शिवसेनिक यांनी समन्वय राखुन उपायोजना कराव्यात अशी अपेक्षा आ.तानाजी सावंत यांनी आपल्या जिल्हा दौर्‍यात विविध तालुक्यात बैठकांच्या माध्यमातून केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण आहे.ते करीत असलेल्या सुचनांचे,आदेशाचे काटेकोर पालन केले जात आहे का नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व शिवसैनिकांनी पार पाडावी असे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.
सोलापूर जिल्हयाचे शिवसेना संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत यांनी गुरुवार दिनांक 12 मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्याचा दौरा करुन त्या त्या तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेे यांच्याकडून कोरोना बाबतच्या उपायोजना,ऑक्सीजन रेमीडीसीवीर,लस उपलब्ध होण्यात येणार्‍या अडचणी,राज्यशासनाच्या महत्वकांक्षी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळण्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या तर ग्रामिण भागातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत ग्रामिण भागात ठिकठिकाणी जनजागृती करण्याचे पदाधिकारी व शिवसैनिकांना आदेश दिले.तर आरोग्य,महसूल आणि पोलीस विभगाच्या स्थानिक वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहीती घेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचयात ते तालुका पातळीवरील अधिकारी यांच्यात समन्वय ठेवत काम झाले पाहीजे,तरच कोरोनाच्या तीसर्‍या लाटेचे आवाहन आपण परतवून लावू असेही आ.तानाजी सावंत म्हणाले.कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणार्‍या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक गावात शिवसेनेच्या वतीने हेल्पलाईन सेंटर सुरु केले जातील.त्यास प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे,त्याच बरोबर कोरोना रुग्णांवर केल्या जाणार्‍या उपचारासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने दर निश्‍चित केले आहेत.त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जावी,बीलांची तपासणी केली जावी अशा सुचनांनी त्यांनी प्रशासनाला केल्या.गावागावात ध्वनीवर्धकावरुन आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी तातडीने उपायोजना करणे गरजेचे असल्याचे आ.सावंत यांनी सांगीतले.
 शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरपूर,मंगळवेढा,माळशिरस व सांगोला,माढा आणि करमाळा तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचाराबाबत येणार्‍या अडचणी तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाउनच्या काळात सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणी बाबत स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर येणार्‍या अडचणी मांडल्या,तर स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा करण्यात येणारी डाळ निकृष्ट गेल्यावर्षीचा साठा असून वितरणासाठी डाळ बदलून मिळावी अशी मागणी केली.
यावेळी तहसिलदार सुशील बेल्हेकर,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,सह.गटविकास अधिकारी श्री पीसे,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,पोलीस निरिक्षक अरुण पवार,आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.जावळे आदी उपस्थित होते.तर शिवेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत,जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे,जिल्हा प्रमुख गणेस वानकर,भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत,मा.जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,तुकाराम भोजने,दत्ता पवार,जयवंत माने,युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे,तालुका प्रमुख महावीर देशमुख,सुर्यकांत घाडगे,नामदेव वाघमारे,सुधाकर लावंड,संजयबाबा कोकाटे,रश्मी बागल,गणेश इंगळे,शहर प्रमुख रविंद्र मुळे,कमरुद्दीन खतीब,समाधान दास,युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव,महीला आघाडी जिल्हा उपप्रमुख आशा टोणपे,महिला आघाडी तालुका प्रमुख आरती बसवंती,संजय घोडके,संदीप केंदळे,ग्राहक कक्षाचे उपजिल्हा प्रमुख सिध्दनाथ कोरे, महेश साठे,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,विनायक वनारे,पोपट सावंतराव,तानाजी मोरे,बाबा अभंगराव,समाधान अधटराव,अविनाश वाळके,सचिन बंदपट्टे,उपतालुका प्रमुख प्रविण शिंदे ,अर्जुन भोसले,विभाग प्रमुख महेश इंगोले,काका बुराडे,माऊली अष्टेकर आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

7 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago